-
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे.
-
दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते.
-
मुलायम सिंह यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
-
मोदींनी काही फोटो ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते.
-
संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केलं.
-
त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेले मुद्दे हे फारच अभ्यासपूर्ण असायचे.
-
तसेच हे मुद्दे राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असायचे, असेही पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ( सर्व फोटो – पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर )

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल