-
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पूरता निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील संघर्ष तीव्र झाला आहे.
-
उद्धव ठाकरे समर्थकांनी वेळकाढूपणा केला. निवडणूक आयोगाकडून तारीख वाढवून मागितली गेली. त्यांच्या वेळकाढूपणामुळेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले, असा आरोप शिंदे गट आणि भाजपाकडून केला जातोय.
-
याच आरोपावर आता उद्धव ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
त्यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला असून विरोधकांना गंभीर प्रश्न विचारले आहेत.
-
सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे. त्याला विलंब कोण करत आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय का होत नाहीये? याचे उत्तर शिंदे गटाने द्यायला हवे.
-
हा विलंब कोण करतंय, हा विलंब कोणाच्या इशाऱ्याने होतोय, हेही सांगावे? असा प्रतिप्रश्न अरविंद सावंत यांनी केला.
-
सुनावणी न करता, छानणी न करता निवडणूक आयोगाने चार तासांत निर्णय घेतला.
-
भाजपाने आग लावली. मात्र आता अंधेरीच्या पोटनिवडणुकीबाबत ते शांत आहेत.
-
त्यांची (भाजपा, शिंदे गट) धनुष्यबाणाविरोधात लढण्याची हिंमत झाली नाही, म्हणूनच त्यांनी चिन्ह गोठवले, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी केली.
-
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कोणाच्या म्हणण्यावरून घेण्यात आला? हे सारं संशयास्पद आहे.
-
आता निवडणूक आयोगाच्या रुपात आणखी एक संस्था वेठबीगार झाली आहे. दाखल केलेल्या शपथपत्रांची छाननी करण्यात आली नाही, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.
-
दरम्यान, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता इतर पर्यायी चिन्हाच्या मागणीवरूनही दोन्ही गटांत वाद होण्याची शक्यता आहे.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य