-
मुसळधार पावसामुळे दिल्लीला पुराचा तडाखा बसला आहे. यामुळे यमुना नदीच्या किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या भीषण परिस्थितीत हतबल झालेली मुलगी टाहो फोडताना…(फोटो सौजन्य- एपी)
-
यमुना नदीला आलेल्या पुरामुळे डझनभर कुटुंबांना या ठिकाणाहून विस्थापित व्हावे लागले आहे. या कुटुंबांनी रस्त्याच्या कडेला आश्रय घेतला आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
तात्पुरता आश्रय घेतलेल्या ठिकाणांवर विस्थापितांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
पुरामुळे विस्थापित व्हावं लागल्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीतही मोठ्या जिद्दीने या मुलीने अभ्यासाची गोडी कायम ठेवली आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
यमुना नदीच्या पुरात काठावरील झोपड्या बुडाल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन विधींसाठी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
यमुनेच्या काठावरुन स्थलांतर केल्यानंतर विस्थापित कामगार २२ वर्षीय रिना यांना कुटुंबासह रस्त्यावर आश्रय घ्यावा लागला आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
विस्थापित महिला आणि लहान मुलांना जेवणासाठी रांगेत उभे राहावं लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
विस्थापित कामगारांना रस्त्यांच्या कडेला अंधारात रात्र घालवावी लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
यमुनेने रौद्र रुप धारण केल्यामुळे ठिकठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाणी साचले आहे.(फोटो सौजन्य- एपी)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख