-
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.
-
वांद्रे येथील ‘रंगशारदा’मध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेश दिला. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असंही ते म्हणाले.
-
सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा असं सांगत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशी सूचना केली.
-
“मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
-
लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
-
राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फॉर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
-
तसंच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले “दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा”.
-
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं की “राज ठाकरेंनी बैठकीत महानगरपालिका निवडणुकांना कसं सामोरे जायचं यासंदर्भातील मार्गदर्शन केलं. सर्व महापालिकांच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शन राज ठाकरेंनी केलं”.
-
राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला का? असं विचारण्यात आलं असता सगळ्या महापालिकांमधील सगळ्या जागा म्हणजे अर्थ तोच झाला असं सांगत त्यांनी दुजोरा दिला.
-
-
“आम्हाला सहानुभूती मिळत असल्याचा, आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असा खोटा प्रचार सुरु आहे. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
-
“मनसेबद्दल लोक सकारात्मक असून, तुम्हीदेखील सकारात्मक राहा. आपण सत्तेत येऊ आणि तुम्हालाच त्या खुर्चीवर बसायचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
-
बाळासाहेबांनी कधीच आपल्याकडे कोणतं पद घेतलं नव्हतं आणि तीच शिकवण राज ठाकरेंकडे आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याप्रकारे बाळासाहेबांकडे होता, त्याप्रकारे आम्ही सत्तेत आल्यानंतर तो राज ठाकरेंकडे असेल असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
-
“बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना फक्त यशच मिळालं नाही. त्यांना पराभवही पाहावा लागला. पण पराभवामुळे ते कधी रडले नव्हते. आम्हीदेखील विजय, पराभव पाहिला. पण आम्ही रडलो नाही, तर लढलो. येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला सर्वात मोठं यश मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
-
“मनसेबद्दल लोक सकारात्मक असून, तुम्हीदेखील सकारात्मक राहा. आपण सत्तेत येऊ आणि तुम्हालाच त्या खुर्चीवर बसायचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
-
(File Photos)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”