-
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जात आहे. त्यात अनेक अण्वस्त्र चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.
-
त्यात आता उत्तर कोरियांचे हुकूमशाह किम जोंग उन यांचा एक फोटो समोर आला आहे.
-
त्यामध्ये ते स्वत: या चाचण्यांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.
-
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केलेल्या शेजारील देश तणावाखाली आले आहे.
-
अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले आहे. त्यानंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली होती.
-
जपान सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
-
याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्त्रच्या चाचण्या केल्या आहेत.
-
त्याशिवाय या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.
-
दरम्यान, शनिवारी पुन्हा उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे वृत्त आहे.
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य