-
राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
परंतु, मुंबई महापालिकेने राजीनामा न स्वीकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
-
याबाबत निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला तातडीने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या ऋतुजा लटके यांच्याबद्दल जाणून घेऊया.
-
ऋतुजा लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. मे महिन्यात रमेश लटके यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झालं. त्यांना दोन मुले आहेत.
-
रमेश लटके हे अंधेरी पूर्व भागातून दोन वेळा आमदार म्हणून निवडूण आले होते. त्याआधी ते नगरसेवकही होते.
-
आता त्यांच्या जागेवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
ऋतुजा या मुंबई महापालिकेत कारकून(क्लर्क) आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून त्या महापालिकेत नोकरी करत आहेत.
-
करोना महामारीच्या काळातही त्यांनी सेवा बजावली होती. ऋतुजा लटके या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या.
-
ऋतुजा लटके या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
-
ऋतुजा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत “आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असू”, असं म्हणाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
-
“शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, निशाणी – मशाल”, असं कॅप्शन देत ऋतुजा यांनी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नवीन चिन्हाचा लोगोही पोस्ट केला आहे.
-
(सर्व फोटो : ऋतुजा लटके/ फेसबुक)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”