-
मुंबईत आज दमदार पावसाने हजेरी लावली.(फोटो-गणेश शिरसेकर)
-
यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
-
रस्त्यांवर चालणाऱ्यांपैकी ज्यांच्याकेड छत्री होती, त्यांनी पावसापासून स्वत:चा बचाव केला.
-
तर छत्री नसणाऱ्यांना पावसात भिजण्याशिवाय पर्याय नव्हता.
-
अनेकजण भिजतच मार्गक्रमण करत होते, कारण पाऊस लवकर थांबण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती.
-
तर एका छत्रीत दोन जण चालतानाही दिसून आले.
-
मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी अक्षरशा झोडपले.(फोटो-पवन खेंगेर)
-
दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागात पाणी साचले होते.
-
परिणामी वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहरातील मध्यभागासह अन्य प्रमुख भागात जोरदार पाऊस पडला.
-
त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
-
घराबाहेर पडलेल्यांनी छत्रीचा आधार घेतला.
-
तर अनेकांनी रस्त्याच्या कडेला आडोशाला उभे राहणे पसंत केले.
-
काही ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यांवर पावसामुळे गर्दी कमी दिसून आली.
-
शालेय विद्यार्थ्यांनी मात्र पावसात भिजत मित्रांसोबत सायकल चालवण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
-
पाऊस सुरू असताना रस्त्यांवर दुचाकी ऐवजी रिक्षा आणि चारचाकी वाहनं दिसत होती.
-
पुणे शहरातील जंगली महाराज रस्ता अक्षरशा जलमय झाला होता.
-
या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले होते.
-
हवामान विभागाकडून शहर व परिसरात पुढील दोन दिवस पिवळा इशारा देण्यात आला आहे.
-
त्यामुळे पुढील दोन दिवस अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
AFMC स्टेडियमवर 29 व्या ऑल इंडिया RPF (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) अॅथलेटिक चॅम्पियनशिप 2022 च्या पुरुषांची अंतिम फेरीत. कुत्र्याने मैदानावर प्रवेश केला होता.(फोटो -अरुल होराएझन)
-
मुसळधार पावसामुळे स्टेडियममधील समापन सोहळा रद्द करून तो दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”