-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा आणि उद्धव ठाकरे गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे.
-
दोन्ही गटांकडून जोमात प्रचार केला जातोय.
-
असे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने ही निवडणूक लढू नये, असे आवाहन केले आहे.
-
तसे पत्रच राज ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिले आहे.
-
राज ठाकरेंच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
-
राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
राज ठाकरे यांनी एका महिन्यानंतर हे पत्र लिहिले आहे. पण उशीरा का होईना, राज ठाकरेंच्या या पत्रानंतर आपण आपल्या संस्कृतीचा किती ऱ्हास करत आहोत, हे भाजपाला समजेल.
-
किमान या पत्रामुळे तरी भाजपाला आपल्या संस्कृतीची आठवण होईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
-
तसेच राज यांच्या पत्रावर उद्धव ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
-
अंधेरीत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
-
त्यांना भूमिका मांडण्यासाठी थोडा उशीर झाला. असे असले तरी ही भूमिका स्वागतार्ह आहे.
-
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी (राज ठाकरे) या संस्कृतीची भाजपाला आठवण करून दिली हेही खूप झाले, असे अरविंद सावंत म्हणाले.
-
तसेच राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
-
भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल.
-
तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
-
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे.
-
त्यात तक्रार करण्याचे काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
-
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या आवाहनावर भाजपा काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली