-
दिवाळी हा प्रकाशाचा सण. लहानांपासून मोठ्यांपर्यत हा आवडीचा सण येत्या काही दिवासांवर येऊन ठेपला आहे.
-
गेली २ वर्ष कोविडमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे कोणतेही सण साजरे करता आले नव्हते.
-
मात्र, यंदा निर्बंधाविना दिवाळी साजरी करता येत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
-
पुण्यातील लक्ष्मी पेठेत नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
-
गेल्या दोन वर्षात दिवाळी निर्बधात गेल्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या.
-
मात्र, यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे बाजरापेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत.
-
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली आहे.
-
घराघरांमध्येही दिवाळीची लगबग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
दिवाळी तोंडावर आल्यामुळे कारागिरही तयारीला लागले आहेत.
-
पुण्यातील कुंभारवाड्यात कारागिरांकडून दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या आणि मुर्त्या बनवण्याचे काम जोरात सुरु आहे.
-
दिवाळीत लहान मुलांचा मुख्य आर्कषण असलेला किल्ला बनवण्यात कारागिरी मग्न आहेत.
-
दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्तीही कारागिरांकडून बनवण्यात येत आहे.
-
आधी कोरोनाचं सावट आणि पाऊस यांचा फटका पुण्याच्या कुंभार समाजाला बसला आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे तयार केलेल्या मातीच्या पणत्या सुकतच नाहीत.
-
त्यामुळे त्या रंगवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ दिवसागणिक कमी होऊ लागला आहे.
-
यावर्षी ग्राहकांची पणत्यांना चांगली मागणी आहे.
-
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे पणत्यांसह मुर्त्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
-
फोटो सौजन्य (ओशविन काधव, पवन खेंगरे, एक्सप्रेस)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन