-
मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार होती. त्यात आता भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून ही घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
-
माघार घेतल्यानंतर उमेदवार मुरजी पटेल यांनी म्हटलं की, “मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी दबावामुळे अर्ज मागे घेतला नाही. कोणाचाही माझ्यावर दबाव नव्हता. तसेच, अपक्ष देखील लढणार नाही. पुढील काळात अंधेरीच्या जनतेची सेवा करत राहीन.”
-
यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अंधेरी निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटकेंनीही आवाहन केलं होतं. रमेश लटके आमचा सहकारी आमदार होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे, आमचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं.”
-
“एकंदरीत आपण महाराष्ट्रात ज्या आमदाराचा मृत्यू होतो त्याच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला तर ती निवडणूक बिनविरोध होते. तसं बघायला गेलं तर भाजपा आणि शिवसेना युतीने उमेदवार दिला होता, त्याने जोरात तयारीही केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वासही होता. परंतु, सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा केली,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले, “मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष असूनही ४५ हजारांपेक्षा अधिक मतं घेतले तो उमेदवार आम्ही उभा केला होता. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. पणस विचार करून मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर माघर घेण्याचा हा निर्णय आम्ही घेतला आहे.”
-
यावर शरद पवारांनी सांगितलं की, “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल. माझी भाजपाकडे कोणतीही मागणी नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. उशिरा झाला असला तरी निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले.
-
“नांदेडची पोटनिवडणूक झाली, पंढरपूरला पोटनिवडणूक झाली. यावेळेचं सर्व वातावरण लक्षात घेता. दिवाळी तोंडावर आहे हे पाहता. या सर्व धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळाही होती. त्याही कामाला लागल्या होत्या. त्याही घरोघरी फिरत होत्या. सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित हा चांगला विचार त्यांनी (भाजपाने) केला असावा,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
-
“काल राज ठाकरेंनी पत्र लिहीले होते. भाजपाने त्यावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुळात गेल्या एक महिन्यापासून राज्यात जी चिखलफेक सुरूहोती, ती टाळता आली असती. मात्र, आता शेवट गोड होतोय याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
-
“अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने उमेदवार मागे घेतला, तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”