-
पुणे शहर आणि परिसरात काल(सोमवार) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यंत सुरू होता. (सर्व फोटो – सागर कासार)
-
सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई परिसरही जलमय झाला होता.
-
पावसाचे पाणी मंदिरातही शिरले होते.
-
मंदिरात भाविक उभा राहून दर्शन घेतात तो भाग पूर्णपणे जलमय झालेला होता.
-
मंदिराच्या समोरील रस्त्यावर तर गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले होेत.
-
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली.
-
रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता.
-
सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.
-
नदी पात्रातील पाणी पातळी वाढली आणि गाळ वाहून आला होता.
-
तर अनेक भागात विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.
-
मुसळधार पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही चांगलाच बसला.
-
दुकानातील मालाचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.
-
दुकानात शिरलेले पावसाचे पाणी काढताा दुकानदारांना मोठी कसरत करावी लागली.
-
पाऊस ओसरल्यावरही दुकानांच्या सभोवताली पाणीच साचलेले होते.
-
पहाटे चारपर्यंत २० ठिकाणीं पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
-
शहराच्या विविध भागांतून अग्निशमन केंद्रांत दूरध्वनी येत होते. रात्री बारानंतरही पाऊस कायम होता.
-
पावसाच्या फटक्यातून सावरत व्यावसायिक पुन्हा दुकान लावत होते.
-
अनेक दुकानांमध्ये तर अद्यापही पाणी आहे.
-
दुकानात पाणी असल्याने सर्व सामान बाहेर काढावे लागले.
-
दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
-
पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळांतच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले.
-
त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनेही रस्त्याने चालविणे कठीण झाल्याने संपूर्ण शहरच ठप्प झाले. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले.
-
शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच