-
कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे. बुधवारी(१९ सप्टेंबर) झालेल्या निवडणुकीत त्यांनी बहुमतांनी विजय मिळवला.
-
मल्लिकार्जुन खरगे यांच्या रुपाने तब्बल २४ वर्षांनंतर कॉग्रेस पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे.
-
याचनिमित्ताने मल्लिकार्जुन खरगे यांची एकूण संपत्ती, नेट वर्थ यावर एक नजर टाकूया.
-
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खरगे खासदार म्हणून निवडूण आले.
-
निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीनुसार, २०१९ साली त्यांची एकूण संपत्ती १५ कोटींपेक्षा अधिक आहे.
-
खरगे यांनी २५ लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले आहेत.
-
तर त्यांच्याकडे सुमारे ४० लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
-
त्यांच्या नावावर शेतजमीनीही आहे. त्यांची किंमत सुमारे दीड कोटी इतकी आहे. याशिवाय ४२ लाख किमतीची जागाही त्यांच्या नावे आहे.
-
मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर सुमारे दोन कोटींच्या व्यावसायिक आणि आठ कोटींच्या रहिवाशी मालमत्तेची नोंद आहे.
-
त्याचप्रमाणे त्यांनी ३३ लाखांचे कर्ज घेतले असल्याचंदेखील त्यात नमूद करण्यात आलं आहे.
-
२०२०मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खरगे यांच्या संपत्तीत १५ महिन्यांत ४० टक्क्यांनी वाढ झाली होती.
-
त्यानुसार खरगे एकूण २० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असल्याची माहिती आहे.
-
याशिवाय त्यांच्या कर्जाची रक्कमेतही घट होऊन ती २३ लाखांवर आली आहे.
-
राहुल गांधीपेक्षा मल्लिकार्जुन खरगे यांची संपत्ती अधिक आहे. राहुल गांधी एकूण १५ कोटी संपत्तीचे मालक आहेत. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात