-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) उत्तराखंडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
-
त्यांनी बद्रीनाथ मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले.
-
मोदींनी केंदरानाथ मंदिरासही भेट दिली.
-
केदारनाथमध्ये त्यांनी गर्भगृहात सुमारे 20 मिनिटे पूजा केली.
-
. त्यांनी एक खास पोशाख परिधान केला होता, जो जो हिमाचलच्या महिलांनी त्यांना भेट म्हणून दिला होता.
-
त्याला चोल-दोरा म्हणतात या पोशखावर पाठीमागे स्वस्तिक होते.
-
यादरम्यान पंतप्रधानांनी बद्रीनाथच्या माना गावात रस्ता आणि रोपवे प्रकल्पांची पायाभरणी केली.
-
याप्रसंगी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे होते.
-
त्यानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथ यांना पाहून मन प्रसन्न झाले, जीवन धन्य झाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माना गाव हे भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते पण माझ्यासाठी सीमेवरील प्रत्येक गाव हे देशातील पहिले गाव आहे.
-
सीमेवरील तुमच्यासारखे सर्व मित्र देशाचे भक्कम पहारेकरी आहेत.
-
21 व्या शतकातील विकसित भारत घडवण्याचे दोन प्रमुख आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
पहिला – आपल्या वारशाचा अभिमान आणि दुसरा – विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न.
-
माना गावात पीएम मोदी म्हणाले की, “पूर्वी ज्या भागांकडे देशाच्या सीमांचा शेवट म्हणून दुर्लक्ष केले जात होते, तेथून आम्ही समृद्धीची सुरुवात म्हणून काम सुरू केले.
-
दुर्लक्षित राहिलेले देशातील शेवटचे गाव ओळखून आम्ही तेथील लोकांच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित केले.
-
ते म्हणाले की, अयोध्येत असे भव्य राम मंदिर बांधले जात आहे, गुजरातमधील पावागढ येथील माँ कालिकेच्या मंदिरापासून ते विंध्याचल देवीच्या कॉरिडॉरपर्यंत भारत आपल्या सांस्कृतिक उन्नतीसाठी हाक देत आहे.
-
पंतप्रधान म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी लाल किल्ल्यावरून हाक दिली होती.
-
ही हाक गुलामगिरीच्या मानसिकतेतून संपूर्ण मुक्तीसाठी आहे.
-
कारण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपला देश गुलामगिरीच्या मानसिकतेने एवढा ग्रासलेला आहे.
-
की प्रगतीचे काही काम काहींना गुन्हाच वाटतो.
-
हे लोक परदेशात आपल्या संस्कृतीशी संबंधित स्थळांचे गुणगान करून थकले नाहीत, पण भारतात या प्रकारच्या कामाकडे तुच्छतेने पाहिले जात आहे.
-
पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक कनेक्टिव्हिटी ही राष्ट्रीय संरक्षणाची हमी आहे.
-
त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून आम्ही या दिशेने एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहोत.
-
भारतमाला अंतर्गत देशातील सीमावर्ती भाग उत्तम आणि रुंद महामार्गांनी जोडले जात आहेत.
-
सागरमालाशी समुद्रकिनाऱ्यांची जोडणी मजबूत केली जात आहे.
-
ते म्हणाले, “संवेदनशील सरकार, गरिबांची दुरवस्था समजून घेणारे सरकार आज देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जाणवत आहे.
-
कोरानाच्या काळात जेव्हा लस घेण्याची वेळ आली तेव्हा जर पूर्वीची सरकार असतं तर कदाचित इथपर्यंत लसही पोहचली नसती.
-
सकाळी साडेआठ वाजता मोदी केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी पोहचले होते.
-
बद्रीनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा