-
जवान आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच म्हणजेच सीमेवरच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत.
-
नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी दिवाळीनिमित्त दिवे लावून दिपोत्सव साजरा केला.
-
यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा, असा संदेशही दिला.
-
कर्नल इक्बाल सिंह यांनी म्हटले की, मी देशवासीयांना सांगू इच्छितो की चिंता करू नका आणि आनंदात दिवाळीचा सण साजरा करा.
-
मी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे सैनिक सतर्क आहेत आणि सीमेवर लक्ष ठेवून आहेत.
-
सीमेवरील भारताचे वीर जवान आपल्या देशवासीयांना आनंदात सण-उत्सव साजरे करता यावेत म्हणून आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत आहेत.
-
देशाच्या रक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची या जवानांची तयारी असते.
-
त्यामुळे भारतीय जवान हे प्रत्येक देशवासीयांचा अभिमान असतात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”