-
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड करण्यात आली आहे. सुनक यांना सत्ताधारी पक्षातील १०० हून अधिक खासदारांनी पाठिंबा दर्शवल्याने प्रतिस्पर्धी पेनी पेनी मॉर्डन्ट यांनी माघार घेतली. त्यामुळे सुनक यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं.
-
४२ वर्षीय ऋषी सुनक यांची २०२० साली ब्रिटेनच्या अर्थमंत्री पदी वर्णी लागली होती.
-
ऋषी सुनक यांना लाडाने ‘डिशी ऋषी’ असे म्हटलं जातं.
-
ऋषी सुनक मद्याचे व्यसन करत नाहीत. मात्र, डाउनिंग स्ट्रीट येथे झालेल्या पार्टीत करोना नियमांचे उल्लंघन सुनक यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
-
ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबचे आहेत. ऋषी यांचे शिक्षण कॅलिफोर्नियातील विंचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात खासगी बोर्डिंग शाळेत झालं.
-
ऋषी सुनक यांचे अक्षता मूर्तीबरोबर लग्न झालं आहे. अक्षता मूर्ती या इंन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांची कन्या आहे. अक्षता आणि ऋषी यांची अमेरिकेत ओळख झाली होती. ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत.
-
ब्रिटनेचे माजी मंत्री पेनी मॉर्डंट यांच्याबरोबर ऋषी यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं बोललं जातं. त्यांच्याबरोबर ते अनेकदा दिसलेही आहेत.
-
करोना संसर्गादरम्यान व्यापारी आणि जनतेला ऋषी सुनक यांनी हजारो कोटी रुपयांची मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
-
ब्रिटन संसदेत ऋषी सुनक यांनी भगवद्गीतेला स्मरून खासदार म्हणून शपथ घेतली होती. अशी शपथ घेणारे ते ब्रिटनचे पहिले खासदार ठरले.
-
ऋषी सुनक यांना क्रिकेटची आवड आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी ते क्रिकेट खेळत असतात.
-
ऋषी सुनक यांच्याकडे तब्बल ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचं सांगण्यात येत. यॉर्कशायर येथे एक घर त्याशिवाय लंडनमधील केंसिंग्टन येथेही त्यांची मालमत्ता आहे.
-
पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महागडे सूट, भव्य घर आणि बुटांमुळे ऋषी सुनक यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यावर तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भगवद्गीता मदत करते, असे ऋषी सुनक यांनी म्हटलं होतं. ( फोटो साभार / इंडियन एक्सप्रेस )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”