-
सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी देशाची राजधानी दिल्लीसह लगतच्या परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत घसरलेली पाहायला मिळाली.(फोटो सौजन्य-प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या हंगामात दिल्लीकरांना दिवाळीत अत्यंत प्रदुषित हवेचा सामना करावा लागला. या प्रदुषित हवेतच आकाशाकडे झेपावताना पक्षी.(फोटो सौजन्य-प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
मुंबईकरांनीही आतिषबाजीमुळे प्रदुषित हवेचा अनुभव घेतला. नवी मुंबईतील पाम बीचवर दिवाळीला संध्याकाळी ठिकठिकाणी अशाप्रकारे फटाक्यांचा धूर पाहायला मिळाला.(फोटो सौजन्य- अमित चक्रवर्ती, एक्स्प्रेस)
-
‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (SAFAR) या संस्थेने मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत घसरल्याचं म्हटलं आहे.(फोटो सौजन्य- अमित चक्रवर्ती, एक्स्प्रेस)
-
दिवाळीच्या दिवशी पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती, असं ‘SAFAR’ या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य- अरुल हॉरिझोन, एक्स्प्रेस)
-
पुण्याच्या वानवाडी परिसरात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास अशाप्रकारे धूर पसरला होता.(फोटो सौजन्य- अरुल हॉरिझोन, एक्स्प्रेस)
-
आंध्र प्रदेशच्या काही भागात दृश्यमानता पातळीही कमी नोंदवली गेली. हैदराबादमधील उड्डाणपुलाला अशाप्रकारे धुरानं वेढलं होतं.(फोटो सौजन्य-एपी फोटो)
-
फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे काही नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. यातून वाचण्यासाठी अहमदाबादेत तोंडावर पदर ठेवून चालताना महिला.(फोटो सौजन्य-एपी)
-
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ३०१ ते ४०० दरम्यान असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब मानला जातो. दीर्घकाळापर्यंत या हवेच्या संपर्कात आल्यास श्वसनाचे आजार बळावू शकतात. (फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या