-
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतो. गेल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातारण होते.
-
फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आसमंत तर पणत्या आणि दिव्यांच्या झगमगाटाने परिसर उजळून गेला होता.
-
वाराणसीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने अस्सी घाटावर ‘गंगा आरती’ दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी कऱण्यात आली होती. (फोटो पीटीआय)
-
देशाची राजधानी नवी दिल्लीत उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी लोकांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
दिवाळीत अनेक ठिकाणी रंगाने भरलेली रांगोळी काढली जाते. नागपूरात एका ठिकाणी महिलांनी महिलांनी मातीच्या दिव्यांनी सजवलेली रांगोळी. (फोटो: पीटीआय)
-
पौराणिक कथानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. श्रीरामांच्या आगमनाच्या आनंदाने दिवाळी सण साजरा केला जातो.
-
वाराणसीमध्ये दिवाळीनिमित्त राम आणि देवी जानकीची प्रार्थना करताना महिला. (फोटो: पीटीआय)
-
चिकमंगळूर जिल्ह्यातील दिवाळीत नरका चतुर्दशीच्या दिवशी गिरी देवीरम्मा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविक देवीरम्मा टेकडीवर चढतात. (फोटो: पीटीआय)
-
रविवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर विलोभनीय दिसत होते. (फोटो: पीटीआय)
-
२३ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी रात्री दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाट जवळ, भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणावर सीमा सुरक्षा दलाचे जवान मेणबत्त्या पेटवून दिवाळी साजरी केली. (फोटो: PTI)
-
दिवाळी मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात येते. बेंगळुरूमधील केआर मार्केटमध्ये लोकांनी गर्दी केली होती. (छायाचित्र जितेंद्र म.)
-
दिवाळीनिमित्त अयोध्येत लाईट शोचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
-
दिवाळीनिमित्त गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. हजारो दिव्यांनी परिसर उजळून गेला होता. (निर्मल हरिंद्रन एक्सप्रेस फोटो)
-
दिवाळीनिमित्त चंदीगडच्या सेक्टर १७ मध्ये पणत्यांच्या माध्यमातून ‘जय श्री राम’ लिहीत श्री रामांची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
अयोध्येत लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला ‘दीपोत्सव’ उत्सवादरम्यान फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. (पीटीआय फोटो)
-
कानपूरमध्ये, दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जे.के मंदिरात ‘महाआरती’ करण्यात येते. (पीटीआय फोटो)
-
अमृतसरमधील दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला सुवर्णमंदिर दिव्यांनी उजळले होते. (पीटीआय फोटो)
-
नादिया गावात दिवाळी सणाच्या उत्सवाचा भाग म्हणून महिला मातीचे दिवे लावतात. (पीटीआय फोटो)
-
वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवी कालीचे शिल्प तयार करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (पीटीआय फोटो)
-
नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातही मातीचे दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. (पीटीआय फोटो)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…