-
दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरासह अमेरिकेतही उत्साह दिसून आला.
-
यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही त्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.
-
या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि फर्स्ट लेडी जिल बायडेनदेखील उपस्थित होत्या.
-
तसेच बायडेन प्रशासनातील अनेक भारतीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
-
यावेळी बोलताना जो बायडेन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. यापूर्वी वाईट हाऊसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी कधीच साजरी करण्यात आली नव्हती. मी दिवाळी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी यावेळी बोलताना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
यावेळी व्हाईट हाऊसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
-
तसेच यावेळी नृत्याचे सादरीकरणही करण्यात आले.
-
या कार्यक्रमात जो बायडेन यांची मुलगी ऍशल बायडेन यांनीही सहभाग घेतला होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”