-
माजी मंत्री तथा उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी आज (२९ ऑक्टोबर) मुंबईतील शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत शिंदे गट तसेच राज्य सरकारवर सडकून टीका केली. (सर्व फोटो- Amit Chakravarty)
-
टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिंदे सरकारला घेरलं. तसेच त्यांनी कृषीमंत्र अब्दुल सत्तार आणि उद्योगमंत्री उदय सामतं यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
-
तसेच त्यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकरी नुकसानीच्या मुद्यावर भाष्य करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली.
-
टाटा एअरबस प्रकल्पतरी महाराष्ट्रात आणावा, असे आम्ही सत्ताधाऱ्यांना सांगत होतो. एकीकडे कृषी क्षेत्राचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही आपल्या हातातून चार प्रकल्प गेले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
पहिला प्रकल्प हा वेदान्त फॉक्सकॉनचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात सांगितले होते, की हा प्रकल्प राज्यात येईल. या प्रकल्पाविषयी ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या. मात्र सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला.- आदित्य ठाकरे
-
दुसरा प्रकल्प हा बल्क ड्रग पार्क हा आहे. आपल्याकडे ३९४ फार्मसी कॉलेज आहेत. मात्र बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प चार अन्य राज्यांना देण्यात आला. सत्ताधारी मात्र हा प्रकल्प राज्यात आणू शकले नाहीत.- आदित्य ठाकरे
-
मेडिकल डिव्हाईस पार्क हा तिसरा प्रकल्पदेखील राज्यातून गेला. हा प्रकल्प औरंगाबादेत होणार होता.- आदित्य ठाकरे
-
चौथा प्रकल्प हा टाटा एअरबस हा आहे. हा चौथा प्रकल्पही महाराष्ट्रातून गेला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आमचा केंद्र सरकारशी चांगला संवाद सुरू होता. मात्र सध्याचे घटनाबाह्य सरकार आल्यापासून सरकारचे एक इंजिन फेल झालेले आहे- आदित्य ठाकरे
-
याच कारणामुळे हे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. कदाचित तिकडच्या राज्यांतील निवडणुकांमुळे हे झाले असावे. कोणत्याही उद्योजक तसेच गुंतवणूकदाराला या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे.- आदित्य ठाकरे
-
या सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याचे माझ्या कानी आले आहे. दोन-तीन आमदारांमध्ये जगजाहीर भांडण सुरू आहे.- आदित्य ठाकरे
-
महाराष्ट्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, ते चांगले नाहीये.- आदित्य ठाकरे
-
एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे.- आदित्य ठाकरे
-
पावसाळी अधिवेशनात पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकासआघाडीनं केली होती. पण या घटनाबाह्य सरकारनं आमचं अद्यापपर्यंत ऐकलं नाही- आदित्य ठाकरे
-
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. याची दखल अद्याप सरकारने घेतली नसून हे दुर्देवी आहे. मी नाशिक आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली. या ठिकाणी शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं आहे.- आदित्य ठाकरे (सर्व फोटो- Amit Chakravarty)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार