-
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील जुना झुलता पूल काल सायंकाळनंतर कोसळला.
-
जवळपास १०० वर्षे जुना असलेला हा झुलता पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली.
-
या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे.
-
पूल पडल्यानंतर अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
-
दुर्घटना घडल्यापासून शोध व बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
-
या दुर्घटनेनंतर नेव्ही, एअरफोर्स, आर्मी व एनडीआरएफ कडून रात्रभर बचाव व शोधकार्य सुरू होते व अद्यापही सुरूच आहे.
-
विशेष म्हणजे या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता.
-
एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता.
-
मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते, असे समजते.
-
दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
-
गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-
अग्निशमन दलासह स्थानिक बचावपथकांनी बोटींद्वारे नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली आहे.
-
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकडय़ा गांधीनगर आणि बडोदा येथून घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्यात हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे.
-
आतापर्यंत ४० ते ५० जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे.
-
या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-
घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
-
पीडितांना तातडीने मदत पोहोचली पाहिजे, याची काळजी घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.
-
मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
-
तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
-
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करतानाच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बचावकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-
ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य सुरू झाले.
-
बोटीद्वारे बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.
-
आर्मीचे जवानही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत
-
अनेकांना वाचण्यात यश आले असले तरी अनेकजण अद्यापही बेपत्ता आहे.
-
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
-
या भयानक दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
स्थआनिकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला आहे.
-
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी घटनास्थळी दाखल आहेत.
-
तर भाकप खासदार बिनोय विस्वम यांनी या दुर्घटनेला गुजरातचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच पीडितांना जाहीर झालेल्या मदतीत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केला.

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?