-
पुण्यातील लुल्लानगर परिसरातील मार्वल व्हिस्टा इमारतीतील सातव्या मजल्यावरील हॉटेलला आज(मंगळवार) सकाळी भीषण आग लागली.(सर्व फोटो- अरुल होराएझन)
-
आग एवढी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण हॉटेल जळून अक्षरशा खाक झाले.
-
लुल्लानगर परिसरातील मार्वल व्हिस्टा इमारतीत सातव्या मजल्यावर व्हेजिटा हे रुफ टॉप हॉटेल आहे.
-
या हॉटेलमध्ये सकाळी साधारण आठ वाजता अचानक आग लागली.
-
घटेनेची माहिती मिळाताच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
-
यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
-
मात्र अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.
-
जवळपास तासभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही आग विझवण्यात यश आलं.
-
आग विझवण्या आल्यानंतर कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.
-
प्राप्त माहितीनुसार या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
-
या इमारतीवर बाहेरून काचा असल्याने इमारतीमधून धूर बाहेर पडणे शक्य होत नव्हते.
-
धूर बाहेर पडण्यास पुरेसी जागा नसल्याने इमरतीमध्ये सर्वत्र प्रचंड धूर पसरला होता.
-
हा धूर बाहेर पडावा म्हणून इमारतीच्या काही काचाही फोडण्यात आल्या.
-
या इमरतीमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत.
-
आग इतकी भीषण होती की यामुळे इमरतीच्या टेरेसचेही नुकसान झाले आहे.
-
नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-
आज सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धूर निघाल्याचं प्रत्यक्ष दर्शींना दिसलं होतं.
-
त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ-मोठे आगीचे लोळ उठताना दिसले.
-
सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाल्याचीही माहिती समोर आली होती.
-
तर सिलंडरच्या स्फोटामुळे काही लोखंडी पत्रे झाडावरही उडून पडले होते.
-
हॉटेलच्या आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाला.
-
अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोठ्याप्रमाणवर पाण्याचा वापर केला.
-
हॉटेलमधील सर्व वस्तू जमिनीवर पडलेल्या होत्या.
-
तर टेबल खुर्च्या व अन्य फर्निचरचेही नुकसान झाले आहे.
-
भीषण आगीसमोर छोटे सिलिंडर टिकाव धरू शकले नाही.
-
सिलिंगसह हॉटेलमधील सर्व खोल्यांचे प्रचंड नुकसान झाले.
-
घटनास्थळी सर्वत्र जळालेल्या वस्तूंचा खच पडलेला होता.
-
अग्निशमन विभागाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बघ्यांची गर्दीही झाली.
-
सातव्या मजल्यावरील हे हॉटेल आग लागल्यानंतर अक्षरशा उघडे पडले.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…