-
गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाचे पूल जाणून घेऊया. -
हावडा ब्रिज : हा पूल पश्चिम बंगालमधील असून तो हुगळी नदीवर बांधण्यात आला आहे.
-
विद्यासागर सेतू : हा देशातील सर्वात लांब हवाई ब्रिज आहे. त्याची लांबी ८२३ मीटर आहे. हा पूल हुगळी नदीवर बांधण्यात आलेला आहे. १९४३ साली या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते.
-
वांद्रे वरळी सी लिंक : मुंबईतील हा प्रसिद्ध पूल आहे. या पुलाचे नाव राजीव गांधी सी लिंक असे असून तो ५.६ किमी लांबीचा आहे.
-
कोरोनेशन ब्रीज : या पुलाला सीवोक रोडवे ब्रीजदेखील म्हटले जाते. तो पश्चिम बंगालमधील तीस्ता नदीवर बांधलेला असून त्याचे काम १९४१ साली पूर्ण झाले होते.
-
लक्ष्मण झुला : हा पूल हृषिकेशमधील गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे. हा पूल ४५० फूट लांब आहे.
-
गोदावरी आर्च ब्रिज: राजमुंद्री येथील हा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला आहे.
-
महात्मा गांधी सेतू : हा सर्वांत लांब स्टीलचा पूल आहे. ७ जून २०२२ पासून तो प्रवासासाठी खुला करण्यात आला. बिहारमधील गंगा नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. पटणा आणि हाजीपूर या शहरांना हा पूल जोडतो. (सांकेतिक फोटो)
-
बोगिबील पूल : हा पूल आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे. या पुलावरून रेव्ले तसेच रस्ते वाहतुकीची सोय करण्यात आलेली आहे. या पुलाची लांबी ४.९ किमी आहे. (सर्व फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स