-
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात
-
यंदा यात्रेत गुरूवारी अडीच लाख भाविक दाखल झाले असून उद्या कार्तिकी एकादशीला चार लाखांपेक्षा अधिक भाविकांची मांदियाळी होण्याची अपेक्षा आहे.
-
वारकऱ्यांच्या मंदियाळीने चंद्रभागा वाळवंट फूलून गेले होते.
-
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शनिवारी पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा करण्यात येणार आहे.
-
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
-
एकादशीनिमित्त मंदिरातील गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे.
-
हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश यांसारख्या विधींना सुरुवात होते.
-
कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध दूरवरच्या भागासह शेजारच्या कर्नाटक व अन्य प्रांतांतून भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत.
-
अनेक छोट्या- मोठ्या गावांतून वारक-यांच्या दिंड्या पायी चालत विठ्ठल दर्शनाची आस मनात बाळगून पंढरपुरात दाखल होत आहेत.
-
वाढत्या भाविकांची संख्या पाहता विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना १२ ते १४ तास लागत आहेत.
-
फोटो – मंदार लोहकरे (लोकसत्ता प्रतिनिधी)
माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल