-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्या एका फोनवर गुवाहटीला एकनाथ शिंदे गटात गेले असं वक्तव्य केलं.
-
यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत बच्चू कडूंनाच विचारणा केली असता त्यांनी फडणवीसांच्या दाव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
-
बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं ते चुकीचं नाही. मला फडणवीसांचा फोन आला होता.”
-
“फडणवीसांनी फोन केला त्यावेळी त्यांच्याशी कशा पद्धतीने काम करणार अशी चर्चा झाली,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
-
“फोनवर ते केवळ गुवाहटीला जा असं म्हटले नाहीत. बरीच चर्चा झाली ती आता येथे सांगणं योग्य नाही,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.
-
बच्चू कडू पुढे म्हणाले, “मी मंत्री व्हावं ही लोकांची इच्छा आहे.”
-
“याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्वासन दिलं आहे,” अशी माहिती बच्चू कडूंनी दिली.
-
“मी मंत्री होईल. मला घाई नाही, माध्यमांना का घाई झाली हे मला कळत नाही,” असं म्हणत त्यांनी माध्यमांवर टीका केली.
-
तसेच मला घाई झालेली नाही, मी मविआ सरकारमध्ये असताना कानोसा घेतला की कोणाचं सरकार बनेल, असंही म्हटलं. (सर्व फोटो संग्रहित)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”