-
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर मोठा प्रमाणात गदारोळ सुरू झाला होता. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.
-
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडून तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता.
-
लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने हा महामोर्चा काढण्यात आला होता. हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह इस्लामाबादकडे निघाले होते. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार होता.
-
मात्र, आज ( ३ नोव्हेंबर ) हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला असता त्यावर गोळीबार करण्यात आला.
-
जफरअली खान चौकात हा मोर्चा आला असताना ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली. तसेच या घटनेत अन्य चार जण जखमी झाले.
-
हल्लेखोराने एके-४७ या बंदुकीतून गोळाबार केला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना बुलेटप्रूफ मोटारीतून तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
-
“इम्रान खान लोकांना फसवत होता. मला हे पाहावलं नाही. मग मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला की त्याला जीवे मारू शकेन. फक्त इम्रान खानलाच मारण्याचं मी ठरवलं होतं. इतर कुणालाही नाही. एकीकडे अजान सुरू होती आणि दुसरीकडे हे डेक लावून आरडा-ओरडा करत होते. याचा विचार करून माझ्या डोक्यात हे आलं”, असं खुलासा इम्रान खानवर हल्ला करण्याऱ्या व्यक्तीने केला आहे.
-
”अल्लाहने मला आणखी एक जीवन दिले आहे. मी पुन्हा लढेन”, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली आहे.
-
या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO