-
गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राज्यातील १८२ मतदार संघासाठी एकून दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
-
पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला होणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. निकाल ८ डिसेंबरला जाहीर होईल.
-
त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गुजरातमध्ये प्रामुख्याने भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. पण, यंदा केजरीवाल यांनीही गुजरातमध्ये लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
-
मात्र, भाजपाकडून सत्तेवर कायम राहण्यासाठी तर, काँग्रेसकडून सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीची घोषणा होताच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-
गुजरातसाठी खरगे यांनी जाहीरनामा घोषित केला आहे. त्यानुसार, गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत घरगुती गॅस सिंलेडर देण्याची घोषणा केली आहे.
-
तर, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत करण्यात येणार आहे. नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही मोफत दिली जाणार आहे.
-
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत असलेले कर्ज माफ केलं जाणार आहे.
-
सरकारी नोकऱ्यांत कंत्राटी पद्धत बंद करून ३०० रुपयं बेरोजगार भत्ता देण्यात येईल. तीन हजार नवीन सरकारी शाळा, सहकारी सोसायट्यांना दूधासाठी पाच रुपयांची सबसिडी दिली जाईल.
![गॅस, कर्जमाफी ते सरकारी शाळा काँग्रेसचा गुजरातसाठी जाहीरनामा](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/11/Mallikarjun-Kharge-3.jpg)