-
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर डौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे.
-
याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती संतापले आहेत. चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे. शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
-
‘हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास करण्यात आला. हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं.
-
छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं.
-
मात्र, आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाची मोडतोड करायची का?, असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.
-
आपण सर्वजण मराठे आहोत. त्या काळात मराठा जात नव्हती. मराठा म्हणजे सर्व मराठी माणसे. चित्रपटात काहीही दाखवले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे, महाराजांचा इतिहास वाचवा.
-
छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला असून, ही माझी जबाबादरी आहे. छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड केली, तर खपवून घेणार नाही.
-
हर हर महादेव चित्रपट पाहिला नाही. पण, माझ्याकडे माहिती आली की, त्यात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे.
-
अशा प्रकारे चित्रपट पुन्हा आले तर मी त्यांना आडवा जाणार. मी कोणालाही धमकी देत नाही. मी यापूर्वी कोणाला बोललो नाही, पण आता बोलत आहे, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
-
या घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे यापुढे असे चित्रपट काढू देणार नाही. लोकांना विनंती आहे, त्यांनी असे चित्रपट पाहू नये.
-
सेंसॉर बोर्डाला पत्र देणार आहे. इतिहासाची मोडतोड होत असताना, सेंसॉर बोर्ड परवानगी देतोच कशी, हा सवाल उपस्थित करणार आहे.
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य