-
शिवसैनिक म्हणून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वत:ला विकलं नाही, स्वत:चा मान सन्मान आणि इमान विकलं नाही, अशा व्यक्तीला मिठी मारायला आलो आहे, असे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
-
आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती, म्हणून त्यांनी गुवाहाटीत जात गद्दारी केली.
-
त्या गद्दारांना जनता धडा शिकवणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते अकोल्यातील बाळापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
-
आदित्य ठाकरेंनी सांगितलं, महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना २.५० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली.
-
सुभाष देसाई यांनी करोना काळात ६.५० लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र, हे घटनाबाह्य सरकार आहे.
-
गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
-
राज्यात शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढले असून, उद्योग बाहेर गेले आहेत.
-
महाराष्ट्रातील लोकांना खरे मुख्यमंत्री कोण आहे, याची माहिती नाही. ते गद्दारीचा शिक्का डोक्यावर घेऊन फिरत आहे.
-
उद्योगमंत्र्यांचे नाव कोणाला माहिती नाही. आमचे सरकार असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
-
अब्दुल सत्तारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परवा कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणाले. होय, मी छोटा पप्पू असेल.
-
मला नावं ठेऊन जर महाराष्ट्राची सेवा होत असेल, तर मला अजून १०० नावं ठेवा. पण या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करा. या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून लावलंय.
-
येथून पुढेही महाराष्ट्रात तुम्हाला असंच पळून लावणार, पळवत ठेवणार. कारण तुम्ही जी गद्दारी केलीये, ती या महाराष्ट्राला पटली नाही, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती