-
खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीतून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचं नांदेडच्या देगलूरमध्ये सोमवारी रात्री स्वागत करण्यात आलं.
-
राहुल गांधींनी छ्त्रपती शिवाजीमहाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी सभेत गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’… ही घोषणा देऊन केली.
-
“देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. छोटे आणि मध्यम उद्योग देशातील रोजगाराचा कणा आहेत. हा कणा नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीने आणि जीएसटी धोरणाने तोडला आहे”, असा हल्लाबोल यावेळी गांधी यांनी केला.
-
‘भारत जोडो’ पदयात्रींनी देगलूरमध्ये मशाल मोर्चा काढला होता. राहुल गांधीदेखील हातात मशाल घेत या मोर्चात सहभागी झाले होते.
-
देगलूरमधील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
या यात्रेचे लक्ष्य भारताला एकजुट करण्याचे आहे, असे गांधी यावेळी म्हणाले. भारतामध्ये द्वेष, क्रोध आणि हिंसा पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-
लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही देशभर चालत आहोत. मात्र, या समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना राहुल गांधी…
-
‘भारत जोडो’ यात्रेसाठी बनवलेल्या चित्रफितीमध्ये ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीताचा वापर केल्यामुळे काँग्रेस आणि ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश बंगळुरू न्यायालयाने दिले आहेत.
-
“देशातील हिंसेविरोधात आवाज उठवण्यासाठी कन्याकुमारीतून निघालेली यात्रा श्रीनगरलाच थांबेल. ही यात्रा मध्ये कोणीही रोखू शकणार नाही”, असे गांधी यांनी म्हटले आहे.
-
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत.
-
(सर्व फोटो- राहुल गांधी यांच्या फेसबुकवरुन)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा