-
उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत जामिनावर बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती.
-
ईडीच्या अटकेनंतर साधारण तीन महिने ते कोठडीत होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्तुती केली आहे.
-
मागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत.-संजय राऊत
-
चांगल्या निर्णयांचं स्वागत करायला हवे- संजय राऊत
-
राज्यात सध्या नव्या सरकारची स्थापना करण्यात आली आहे.- संजय राऊत
-
या नव्या सरकारने काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याचे मी स्वागत करतो.- संजय राऊत
-
आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. ज्या गोष्टी जनता, राज्य तसेच देशासाठी योग्य असतात, त्यांचे नेहमीच स्वागत केले पाहिजे.- संजय राऊत
-
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत.- संजय राऊत
-
तुरुंगात असताना मी वर्तमानपत्रात वाचायचो. गरिबांना घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार बहाल करण्याचा निर्णय, असे चांगले निर्णय घेण्यात आले आहेत.- संजय राऊत
-
मी दोन ते चार दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.- संजय राऊत
-
मला वाटतं की राज्यातील कारभार उपमुख्यमंत्री चावलत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्य सरकारचा कारभार चालतोय.- संजय राऊत
-
राज्यात महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस हेच घेत आहेत.-संजय राऊत
-
संजय राऊत आगामी काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांचीदेखील भेट घेणार आहेत.
-
या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुम्ही भेट घेणार आहात का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. राऊतांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे टाळले.
-
मी फडणवीसांची भेट घेणार आहे. माझे जे शासकीय काम आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांकडे आहे. त्यामुळे मी त्यांची भेट घेणार, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा