-
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या नांदेडमधून मार्गक्रमण करत आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
-
या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधींना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
-
नांदेडमधील नवा मोंढा येथे राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.
-
“काळापैसा आम्ही संपवू असा बहाणा भाजपानं बनवला आणि भारतीय रोजगाराचा कणा तोडला. नोटाबंदीनंतर काळापैसा गायब झाला का? उलट काळा पैसा वाढला”, असे गांधी नवा मोंढा येथील सभेत म्हणाले.
-
“भारताची संपूर्ण संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या हाती जात आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही”, अशी सर्वसामान्यांची व्यथा राहुल गांधींनी यावेळी मांडली.
-
“महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब होत आहेत. त्याचप्रमाणे १५ लाखही गायब झाले”, अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
-
भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
-
“नोटाबंदी आणि जीएसटीने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे व्यापारी, शेतकरी, छोटे आणि मध्यम उद्योग नष्ट केले आहेत”, असा आरोप गांधी यांनी केला.
-
या यात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
-
या यात्रेचा विदर्भातील प्रवास १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार आहे. ही यात्रा वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.
-
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात सोमवारी प्रवेश केला.
-
(फोटो सौजन्य- खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्विटरवरुन)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा