-
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले होते.
-
अफजलखानची कबर असलेल्या परिसरात उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती.
-
अफजलखानाच्या कबरीशेजारी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं.
-
शिंदे सरकारकडून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
-
शिवप्रतापदिनीच ही कारवाई कऱण्यात आली.
-
अतिक्रमण हटवताना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
जवळपास १८०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.
-
तसेच परिसरातही जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आला होता.
-
सध्या या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती.
-
हे बांधकाम पाडून टाकण्याची मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
-
न्यायालयालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
-
न्यायालयाच्या आदेशानंतर सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई केली.
-
कबरीबाजूचे बांधकाम हटल्यानंतर आता अफलखानची कबर स्पष्ट दिसत आहे.
-
अफलखानच्या कबरीच्या बाजूल सय्यद बंडाचीही कबर आहे.
-
लांबूनही या दोन्ही कबरी लोकांच्या नजरेस पडतात.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य