-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
-
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील मैसूर आणि चेन्नई दरम्यानच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला.
-
बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून मोदींनी रेल्वेला झेंडा दाखवला.
-
याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण भारतातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेण्यात आलेली आहे.
-
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
-
या अगोदर पंतप्रधा मोदी आज सकाळी बंगळुरुच्या एचएएल विमानतळावर पोहचले.
-
जिथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्रिमंडळातील अनेकमंत्री, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आदींनी त्यांचे स्वागत केले.
-
तर तामिळनाडूत आगमन झाल्यानंतर स्टॅलिन यांनी मोदींचे स्वागत केले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”