-
खासदार राहुल गांधी यांच्या नेत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आलेली आहे.
-
या यात्रेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वेगवेगळ्या क्षेतातील दिग्गज व्यक्ती या यात्रेत सहभागी होत आहेत.
-
आज राहुल गांधी यांच्या यात्रेत उद्धव ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे सहभागी झाले.
-
याआधी काँग्रेसच्या या यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील हजेरी लावली होती.
-
या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.
-
यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली.
-
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेत काल राष्ट्रवादीचे नेते सामील झाले होते. आज मी सामील झालो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
आम्ही वेगवेगळ्या विचारधारेचे लोक असलो तरी संविधानासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत.- आदित्य ठाकरे
-
आमच्या नेत्यांच्या काँग्रेसमधील नेत्यांशी मैत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांनादेखील पाठिंबा दिलेला आहे. आम्ही लोकशाही आणि संविधानासाठी आता एकत्र आलो आहोत.- आदित्य ठाकरे
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: अक्षर पटेलच्या रूपात भारताला पाचवा धक्का, टीम इंडियाने गाठला २०० धावांचा पल्ला