-
शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत संधीचं सोनं करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून कमी कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय.
-
वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
-
शिंदे गटात प्रवेशाची घोषणा करताच वैजनाथ वाघमारे यांनी विभक्त पत्नी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत.
-
तसेच आगामी काळात पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे मांडणार असल्याचा इशाराही दिला. वैजनाथ वाघमारे रविवारी (१३ नोव्हेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
-
वैजनाथ वाघमारेंनी आरोप केली, “सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला.”
-
“मी त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे,” अशी घोषणा वाघमारेंनी केली.
-
“या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे,” असा इशारा वैजनाथ वाघमारेंनी दिला.
-
एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, “तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन.”
-
“माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन,” असं मत वैजनाथ वाघमारेंनी व्यक्त केलं.
-
तसेच एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन,” असं नमूद केलं.
-
माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही असू दे, मी निवडणूक लढेन, असंही वाघमारेंनी म्हटलं.
-
“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं? इतिहासाचे दाखले द्यायला तिला पुस्तक कोणी दिलं?” असा सवालही वाघमारेंनी अंधारेंना विचारला.
-
या आरोपांनंतर आता एकेकाळचे पती-पत्नी असलेल्या वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
-
तसेच राजकीय आरोपांशिवाय व्यक्तिगत आयुष्यातील अनेक विषयही चव्हाट्यावर येऊ शकतात.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”