-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा झाला.
-
यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यासोबत घडलेल्या काही घटनांची माहिती दिली.
-
तसेच या घटनांना विनयभंग म्हणता येणार नाही, असं स्पष्ट केलं. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी मुंबईत वाढले आहे. माझे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा मी ट्रेन आणि बसमधून फिरणारी मुलगी आहे.”
-
“तेव्हा असा प्रवास करणं सामान्य होतं, कौतुकाची गोष्ट म्हणून सांगत नाही,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
-
“मुंबईच्या ट्रेन आणि बसेसमधून लाखोंच्या संख्येने महिला फिरतात, तिथं धक्काबुक्की होत असते,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही मुंबईच्या कणखर मुली आहोत. कोणी मला धक्का मारला, तर आम्ही धक्का देऊ. कारण शेवटी मलाही स्वतःचा बचाव करायचा आहे.”
-
धक्काबुक्कीचे हे प्रकार माझ्यासोबत अनेकदा झालेत – सुप्रिया सुळे
-
मी खासदार असले, तरी शेवटी मी एक महिला आहे. मी जेव्हा ट्रेनमध्ये बसली, कार्यक्रमाला गेली तेव्हा असे प्रकार घडले – सुप्रिया सुळे
-
परवा भारत जोडोत झालं. उत्साही कार्यकर्ते असतात तेव्हा असं होतंच – सुप्रिया सुळे
-
मी भारत जोडोत असं म्हटलं तर ते योग्य नाही. मला माहितीच होतं की तिथं गर्दी आहे – सुप्रिया सुळे
-
तिथं ती मुलं हात ओढत होती. म्हणून ते माझा विनयभंग करायला आले नव्हते. ते त्यांचं प्रेम होतं – सुप्रिया सुळे
-
कधीतरी गैरसमजातून अशा गोष्टी होतात. अशावेळी वाईट वाटलं म्हणून कोणी कोर्टात जात नाही – सुप्रिया सुळे
-
महाराष्ट्रात बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात. त्यावर आम्ही विनयभंगाची केस करत नाही – सुप्रिया सुळे
-
मी म्हटलं जाऊ दे चुकी झाली, आपली संस्कृती नाही म्हणून दुसरा रस्ता घेऊन पुढे चालतो – सुप्रिया सुळे
-
माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले त्या चौकटीत मी वागण्याचा प्रयत्न करते – सुप्रिया सुळे
-
माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली आहे की, गर्दीत गेल्यावर धक्का खायची वेळ आली, तर बाजूला उभी राहा – सुप्रिया सुळे
-
दोन मिनिटं उशीर झाला तरी चालेल, असं मला माझ्या आईने शिकवलं – सुप्रिया सुळे

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस