-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला.
-
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आव्हाडांची बाजू घेत या प्रकरणाचा बागुलबुवा करण्याची गरज नाही असं म्हटलं.
-
याशिवाय महाविकासआघाडीच्या काही महिला नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
-
तसेच धक्का दिला म्हणून विनयभंगाची केस दाखल झाली, तर मुंबईत लाखो केस दाखल कराव्या लागतील, असं म्हणत त्यांनी तक्रारकर्त्या रशीद यांच्यावर निशाणा साधला.
-
या वक्तव्यांवर तक्रारदार रिधा रशीद यांनी प्रत्युत्तर दिले. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
-
हा धक्का आहे का? धक्का लागणं आणि पकडून धक्का देणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत – रिधा रशीद
-
चालताना आपल्याला किती लोकांचे धक्के लागतात. पण हात पकडून धक्का देणं वेगळं आहे – रिधा रशीद
-
व्हिडीओत सर्वांनी पाहिलं की, त्यांनी मला धक्का देऊन आजूबाजूच्या पुरुषांच्या अंगावर ढकललं आहे – रिधा रशीद
-
त्यामुळे माझ्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला धक्का हा गुन्हाच आहे – रिधा रशीद

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस