-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार होत आहे.
-
अशातच धक्का दिल्याची घटना घडल्यानंतर संबंधित पीडित महिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी बैठक झाल्याचाही आरोप होतोय.
-
याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
-
घटना घडल्यापासून गुन्हा दाखल होईपर्यंत मधल्या वेळेत काय घडलं याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली.
-
तसेच दोषी असेल तर अजित पवारावरही कारवाई करा, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
जितेंद्र आव्हाडांना या प्रकरणात कोणी अडकवत आहे का? या प्रश्नावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
-
ती घटना घडल्यापासून त्या भगिणीने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करेपर्यंत मधल्या काळात काय घडलं? त्यांनी कोणाशी चर्चा केली, काय चर्चा झाली याची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. त्यातून चित्र स्पष्ट होईल – अजित पवार
-
विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची भेट राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या घरी झाल्याच्या आरोपाबाबतही अजित पवारांना विचारणा करण्यात आली.
-
त्यावर ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हा दाखल करण्याबाबतची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी होवो किंवा अजित पवारच्या घरी होवो, दोषींवर कारवाई व्हावी.”
-
दोषी असेल तर अजित पवारवरही कारवाई करा – अजित पवार
-
पक्ष म्हणून बैठक घेणाऱ्या नगरसेवकावर काय कारवाई करणार? या प्रश्नावरही अजित पवारांनी उत्तर दिलं.
-
ते म्हणाले, “या प्रकरणात जो दोषी असेल तो समोर आला पाहिजे.”
-
माध्यमं सांगतात म्हणून मी ग्राह्य धरणार नाही. चौकशीत ते पुढे आलं पाहिजे. चौकशीत पारदर्शकपणे ते समोर येईल – अजित पवार
-
मी सत्तेत असतानाही माझ्या कार्यकर्त्यांना सांगत आलोय की, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर मी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही – अजित पवार
-
ही माझी नेहमीची मतं आहेत – अजित पवार

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन