-
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. (फोटो -अमित चक्रवर्ती)
-
याशिवाय भांडूर येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकजण त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासही येत आहेत.
-
पत्राचाळ प्रकरणी दसरा, दिवाळी तुरुंगात गेल्यानंतर संजय राऊत नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.
-
यामुळे शिवसैनिकांमध्ये(ठाकरे गट) सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
दरम्यान आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ईश्वराकडे काय प्रार्थना केली, याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे.(सर्व फोटो-संग्रहित)
-
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “मी असेल, ठाण्यात जितेंद्र आव्हाडांचं एक खोटं प्रकरण सुरू आहे जोरात. हे सगळं केल्यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय मला माहीत नाही.”
-
“पण हे सगळं थांबायल हवं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र त्याच निर्मळ, पारदर्शक पद्धतीने कामाला लागायला हवा.”
-
“आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र, अशी मी आजच्या दिवशी ईश्वराकडे प्रार्थना केली.”
-
तसेच ठाण्यातील राड्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसैनिकांवर जर हल्ले करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही, हे लक्षात घ्या.”
-
“शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे.”
-
“ज्यांनी शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला, ते राजकारणातून, समाजकारणातून आणि जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले. त्यांचं भविष्यात फारकाही चांगलं झालं नाही.”
-
“लढाई संपलेली नाही, माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा खोट्या कारवाया होत राहणार हे मला माहीत आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत ही न संपणारी लढाई आहे . ”
-
“आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल.”
-
“हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे.”
-
“मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.”

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी