-
इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
-
आगामी वर्षासाठी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.
-
आमचं धोरण सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती देणारे असेल. असं मोदी म्हणाले आहेत.
-
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना मंडी आणि कुल्लू येथून ‘कनल ब्रास सेट’ भेट दिला.
-
नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांना सूरत येथील चांदीचा बाऊल दिला.
-
याशिवाय हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील किन्नौरी शाल सुद्धा भेट दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ, गुजरात येथून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांना ‘अॅगेट बाउल’ भेट दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘पाटन पटोला दुपट्टा’ (स्कार्फ) भेट दिला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना ‘पिथोरा भेट’ दिला.
-
पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ‘माता नी पचेडी भेट’ दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कांगरा हे लघुचित्रकलेची भेट दिली.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख