-
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत खून केला.
-
तसेच प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट केले.
-
हत्येनंतर तब्बल सहा महिने आरोपीने हे लपवून ठेवलं. मात्र, अखेर घटना उघड झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली.
-
सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत असले, तरी तब्बल सहा महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आल्याने पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
-
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपी आफताबने सध्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
-
असं असलं तरी नंतरच्या काळात आरोपी आपला कबुलीजबाब फिरवू शकतो.
-
त्यामुळे आरोपीने आपला कबुलजबाबच फिरवला तर या प्रकरणाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
या प्रश्नावर महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी उत्तर दिलं आहे. त्या बुधवारी (१६ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होत्या.
-
मीरा बोरवणकर म्हणाल्या, “मी तपास करताना नेहमी माझ्या अधिकाऱ्यांना सांगायचे की, आरोपीने दिलेला कबुलीजबाबाला शून्य महत्त्व द्या.”
-
“पोलिसांना आरोपीच्या कबुली जबाबावर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास करावा लागतो,” असं मत मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केलं.
-
मीरा बोरवणकर पुढे म्हणाल्या, “आरोपीने गुन्हा कबुल केला आणि साक्षीदार असं म्हणतो यावर अवलंबून राहता येत नाही.”
-
“आरोपी आणि साक्षीदार आपले जबाब बदलतात. हे गृहीत धरूनच तपास केला पाहिजे,” असंही मीरा बोरवणकरांनी नमूद केलं.
-
माझ्या करिअरमध्ये फार क्वचितवेळा मी इतकी थंड डोक्याने हत्या करणारे (कोल्ड ब्लडेड मर्डरर) पाहिले आहेत – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
एकतर्फी प्रेम असेल तर अॅसिड ओतणे, हत्या करणे असे प्रकार होतात. मात्र, अशाप्रकारे हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकणे आणि सहा महिने गुन्हा लपवणे निर्घृण आहे – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
पोलिसांसमोर पहिलं आव्हान म्हणजे यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
याशिवाय मृत तरुणीचा मृतदेहही मिळाला नाही. पोलिसांना मृतदेहाचे काही भाग मिळालेत – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
पोलिसांना आधी ६ महिन्यांनी मिळालेले शरिराचे तुकडे श्रद्धाचे असल्याचे सिद्ध करावे लागेल – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
आरोपी जे सांगत आहे त्यावर विश्वास न ठेवता खोलात जाऊन हत्येचा उद्देश सिद्ध करावा लागेल – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
आरोपी म्हणत आहे की, तो दररोज जंगलात जात होता. तो सोबत मोबाईल घेऊन जात असेल तर कॉल डिटेल्सवरून लोकेशन काढता येईल – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
आरोपी रात्री ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासून जाण्याचे पुरावे मिळू शकतात. काही सुरक्षारक्षक आरोपीला ओळखू शकतात – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)
-
अशापद्धतीने काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, हत्याचे उद्देश आणि मोठ्या प्रमाणात न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यावरच हे प्रकरण अवलंबून असेल – मीरा बोरवणकर (माजी पोलीस महासंचालक)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख