-
बाजीप्रभूंच्या वंशजांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ चित्रपटावर पाच प्रमुख आक्षेप घेतले.
-
यावेळी रतन देशपांडे यांच्यासह अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे इत्यादी उपस्थित होते. बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी घेतलेल्या पाच आक्षेपांचा हा आढावा…
-
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. असं असताना चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरेतुरेच्या भाषेत दाखवला. हे अतिशय खटकणारं आहे आणि चुकीचं आहे – रतन देशपांडे
-
दुसरा आक्षेप हिरडस मावळ येथे समुद्र दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे कुठेही समुद्र नाही. तिथे नदी आहे – रतन देशपांडे
-
चित्रपटात शिरवळ तेथून महाराष्ट्रातील स्त्रिया, मुलींना इंग्रज बोटीतून घेऊन जाताना दाखवलं आहे. मात्र, त्याकाळी मावळमध्ये इंग्रजांचं खरंच इतकं प्राबल्य होतं का? हा मोठा प्रश्न आहे – रतन देशपांडे
-
आम्ही अनेक इतिहासकारांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार, शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्रजांना थोपवून धरलं होतं. मात्र, चित्रपटात इंग्रज सहजपणे स्त्रियांना घेऊन जाताना दाखवलं आहे – रतन देशपांडे
-
तिसरा आक्षेप म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं आहे – रतन देशपांडे
-
लहानपणाचं भांडण दाखवून त्याला विश्वासघात असं नाव दिलंय. तसेच फुलाजीप्रभूंनी त्यांचा लहान भाऊ बाजीप्रभू देशपांडेंचा विश्वासघात केल्याचं दाखवलं आहे – रतन देशपांडे
-
यामुळे फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली आहे. विशालगडावर या दोन वीरबंधूंची समाधी शेजारी शेजारी आहे. ते दोघेही स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले – रतन देशपांडे
-
या दोघा भावांमध्ये २०-३० वर्षे वैर होतं आणि ते अचानक एकत्र आले असं होऊ शकत नाही – रतन देशपांडे
-
सिनेमॅटिक लिबर्डी काल्पनिक चित्रपटात वापरता येते. मात्र, ऐतिहासिक घटना बदलण्याचा कोणालाच नाही – रतन देशपांडे
-
चौथा आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्याक्षणी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, चित्रपटात बाजीप्रभू तंबूच्या बाहेर हजर असल्याचं दाखवलं आहे – रतन देशपांडे
-
शिवा काशिद अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा होती, मात्र चित्रपटात त्या व्यक्तिरेखेला थोडक्यात संपवण्यात आलं आहे. ज्यांनी जो पराक्रम केला तो आपण नाकारू शकत नाही – रतन देशपांडे
-
पाचवा आक्षेप चित्रपटात अफजल खानाला आणण्यासाठी बाजीप्रभूंनी वाईट गवंडी घेऊन खोट्या पद्धतीची मंदिरं बांधली असं दाखवण्यात आलं आहे – रतन देशपांडे
-
अशी मंदिरं बांधणं इतकं सोपं आहे का? देऊन हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण वाईट गवंडी घेऊन खोटी मंदिरं बांधू का? – रतन देशपांडे
-
ऐतिहासिक चित्रपट बनवताना इतिहास सल्लागारांची आवश्यकता असते. हा चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला होता का? – रतन देशपांडे
-
प्रत्यक्षात मी फेसबूकवर चित्रपटातील कलाकारांना चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्हाला दाखवा असं सांगितलं होतं – रतन देशपांडे
-
विचारणा करूनही वंशज म्हणून आम्हाला आधी हा चित्रपट दाखवला नाही – रतन देशपांडे

अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प