-
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केल्याने बंड केलं, असं सातत्याने शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर सांगतात. यावरून शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी दीपक केसरकारांचा समाचार घेतला आहे.
-
दीपक केसरकर फार गोड बोलतात. ते माझे भाऊ आहेत. पण, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे.
-
बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले.
-
केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे. यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरु आहे.
-
त्यामुळे शिवसैनिकांनी पुन्हा नव्याने कामाला लागण्याचे आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं.
-
भाजपा कपटी आणि कारस्थान करणारा पक्ष आहे. शिंदे गट माझा भाऊच आहे.
-
शिंदे गटात गेलेल्या लोकांना पश्चाताप होतोय.
-
शिंदे गट भाजपाच्या राजकारणाने त्रासला आहे, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितलं. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा