-
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे.
-
या यात्रेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या यात्रेत तरुण-तरुणी तसेच ग्रामीण भागातील लोकांनीदेखील सहभाग नोंदवला.
-
दरम्यान, या यात्रेत राहुल गांधी यांनी भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
-
सोबतच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी टीकात्मक भाष्य केले आहे.
-
सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केला आहे.
-
राहुल गांधी यांच्या विधानानंतर राज्यात भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधींवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
-
दुसरीकडे राहुल गांधी आपल्या या विधानावर ठाम आहेत.
-
सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत आहे. ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
-
फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असेदेखील राहुल गांधी म्हणाले आहेत.
-
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
तसेच या निवडणुकीत काँग्रेसकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल असादेखील विचारले जात आहे.
-
याबाबत विचारले असता राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
जनतेचे मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातो. आम्हाला भारताला जोडायचे आहे. सध्या आमची भारत जोडो यात्रा सुरू आहे. हा प्रश्न आमच्या मनात नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
-
यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून झालेली आहे. आम्ही श्रीनगरपर्यंत जाणार आहोत. तेथे आम्ही भारताचा झेंडा फडकवू. सध्या आमचा दुसरा कोणताही विचार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. (सर्व फोटो- ट्विटर)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार