-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्यास आज सकाळी सुरुवात झाली.
-
न्यायालयाने राणेंना ‘अधीश’मधील बांधकाम स्वत:हून हटवावे अथवा मुंबई महानगरपालिकेने पाडकाम केल्यास त्याचे पैसे वसूल करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला होता. (फोटो: अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे कोर्टाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर राणे कुटुंबाकडूनच त्यांच्या घरावर हातोडा चालवला जात आहे. (फोटो: अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
जुहूमधील राणेंच्या या आठ मजली बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलं होतं. राणेंच्या कंपनीनेच या बंगल्याचं बांधकाम केलं आहे. (फोटो: अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
नारायण राणे त्यांच्या जुहू बंगल्यातील कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. परंतु, त्यांच्या नावे एकूण किती बंगल्यांची नोंद आहे हे तुम्हाला ठाऊक आहे?
-
मुंबईतील चेंबूर येथे नारायण राणे व त्यांच्या पत्नीच्या नावे एकाच इमारतीतील दोन फ्लॅट्सची नोंद आहे.
-
याची किंमत प्रत्येकी सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या घरात आहे.
-
पुण्यातील शिवाजी नगर परिसरात नारायण राणेंचा पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला बंगला आहे. त्याची किंमत १२ कोटींच्या घरात आहे.
-
याशिवाय पुण्यातील कोथरुड परिसरात दोन कोटी किमतीचा फ्लॅट त्यांच्या पत्नीच्या नावे आहे.
-
नारायण राणे व त्यांच्या पत्नीच्या नावे कणकवली येथे तीन बंगले आहेत. या तिन्ही बंगल्यांची एकूण किंमत एक कोटी ८० लाखांच्या घरात आहे.
-
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये ८५-८८ लाख किंमतीचे दोन बंगले राणे दाम्पत्याच्या नावे आहेत.
-
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, जुहू येथील ‘अधीश’ बंगला वगळता एकूण ६ बंगले व ३ फ्लॅट नारायण राणे यांच्या मालकीचे आहेत.
-
नारायण राणे यांच्या मालकीच्या बंगल्यांची एकूण किंमत २० कोटी ८१ लाख इतकी आहे.
-
(सर्व फोटो: नारायण राणे/ फेसबुक)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य