-
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’कडून शुक्रवारी श्रीहरीकोटा केंद्रावरून ‘विक्रम-एस’ या पहिल्या खाजगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
चार वर्षांआधी सुरू झालेल्या ‘स्कायरूट एरोस्पेस’ कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केली आहे. हैदराबादमधील या कंपनीने २०२० मध्ये रॉकेट बनवण्यास सुरूवात केली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
ही कंपनी स्टार्ट अप योजनेअंतर्गत सुरू झाली आहे. या कंपनीला ‘इस्रो’ आणि ‘इन स्पेस’ या केंद्राने प्रक्षेपणासाठी मदत केली.
-
या रॉकेटने दोन भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे पेलोड्स घेऊन यशस्वी प्रक्षेपण केले.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह ‘स्कायरूट एरोस्पेस’च्या टीमसोबत…(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह, ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ, ‘आयएनएसपीएसई’चे अध्यक्ष पवन गोएंका आणि ‘स्कायरूट एरोस्पेस’चे सह-संस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भारथ डाका रॉकेटच्या प्रतिकृतीसह…
-
१०१ किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य गाठण्याची या रॉकेटची क्षमता आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
‘विक्रम एस’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
या रॉकेटचं वजन ५४५ किलो आहे. सहा मीटर उंचीचे हे रॉकेट प्रक्षेपणाच्या अडीच मिनिटांनंतर ८९.५ किलोमीटर उंचीवर पोहोचले.(फोटो सौजन्य-इस्रो)
-
‘इस्रो’च्या सहकार्यातून भारतातील खाजगी कंपन्यांनीदेखील अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.(फोटो सौजन्य-इस्रो)
-
विक्रम-एस हे एक सॉलिड स्टेज रॉकेट आहे. स्कायरुटच्या विक्रम सिरीजचा हा एक भाग आहे.(फोटो सौजन्य-इस्रो)
-
(फोटो सौजन्य-इस्रो)

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी