-
kim jong un daughter photos: उत्तर कोरिया आणि तेथील हुकुमशाह किम जोंग उनचे किस्से जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र किम जोंग उनच्या खासगी आयुष्यासंदर्भात फारच कमी माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. असं असतानाच सध्या जगभरामध्ये किम जोंग उनच्या एका जवळच्या व्यक्तीचे म्हणजेच मुलीचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. (सर्व फोटो – रॉयटर्सवरुन साभार)
-
किम जोंग उन आणि त्याची मुलगी हात पकडून एका क्षेपणास्त्र चाचणी केंद्राजवळ चालत असल्याचे फोटो उत्तर कोरिया सरकारच्या नियंत्रणात असलेल्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) जारी केले आहेत.
-
पहिल्यांदाच किम जोंग उन यांची मुलगी जगासमोर आली आहे. नऊ वर्षांच्या या मुलीचं नाव काय आहे यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. पण आतापर्यंत केवळ चर्चा आणि बातम्यांमध्येच किम जोंग उन यांना मुलगी असल्याच्या चर्चा रंगताना पहायला मिळायच्या. पहिल्यांदाच किम जोंग उनची मुलगी जगासमोर आलीय.
-
व्हॉइट कॉलरचं जॅकेट परिधान केलेली ही मुलगी तिच्या वडिलांचा हात धरुन एका लष्करी तळावर चालत असल्याचं दिसत आहे.
-
याच ठिकाणी उत्तर कोरियाने शुक्रवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी ब्लास्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.
-
किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीने एकत्र ही चाचणी पाहिली असं फोटोंमधून दिसून येत आहे.
-
यावेळेस किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू सुद्धा उपस्थित होत्या.
-
किम जोंग उन आणि त्याची मुलगी ज्या ठिकाणी चालत आहे त्या ठिकाणी मागे दिसणारं क्षेपणास्त्र हे आंतरखंडीय अण्वस्त्र आहे. या अस्त्राचा पल्ला अमेरिकेपर्यंत आहे.
-
‘‘आम्हाला कुणी धमकावले, तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’, असा इशारा किम जोंग उन यांनी मे महिन्यातच दिला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किम यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जाते. मात्र त्यानंतर अनेकदा उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या केल्या आहेत.
-
आंतरखंडीय अण्वस्त्राची तपासणी किम जोंग उन यांनी चाचणी सुरु करण्याआधी केली. त्यावेळीही त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर होती.
-
उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरात २० प्रक्षेपण तळांवरून किमान ४० क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. एकीकडे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करताना आणि अण्वस्त्रसज्जता वाढवताना कायद्याचा मुलामा देण्याची किम जोंग यांची खटपट सुरू असते.
-
यंदा मात्र या चाचणीबरोबरच त्यांची मुलगी पहिल्यांदा जगासमोर सार्वजनिकरित्या आल्याची चर्चा जगभर सुरु असून ही मुलगीच किम जोंग उन यांची वारस असणार का यासंदर्भातही चर्चा सुरु झाल्या आहेत.

Ajit Pawar : पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर, म्हणाले…