-
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावरून काँग्रेस, शिवसेना तसंच काही संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यपालांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. राज्यपाल अशी वेगवेगळी वक्तव्यं का करत आहेत हे कळत नाही.
-
शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावं लागतं?, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.
-
महाराष्ट्रात फार सोशिकता आहे हे त्यांना सांगायला हवं. इतर राज्यात जर असं काही झालं असतं तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं.
-
राज्यात राज्यपालांचा मान राखला जात आहे. मग राज्यापालांनीसुद्धा तितकंच जबाबदारीने विधान केलं पाहिजे.
-
राज्यपालांनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.
-
शिवाजी महाराजांची तुलना कृपया कुणाशीही करु नका.
-
तुम्ही प्रथम नागरिक आहात, सांभाळून बोला. काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका. जगभर महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो.
-
अफजलखानाला पत्रं पाठवणे ही शिवाजी महाराजांची रणनीती होती, असं यावेळी भुजबळांनी सांगितलं.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित