-
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार असल्याचे, यापूर्वी म्हटलेले आहे.
-
तसा प्रस्तावही त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला दिलेला आहे. असे असताना आज (२० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर मुंबईत एका कार्यक्रमात एकत्र आले.
-
दरम्यान, राज्यात भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
यावरच शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२० नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
तर्कवितर्क लावणे योग्य नाही. काही लोक व्यासपीठावर आले म्हणजे युती झाली आणि व्यासपीठावर एकत्र आले नाही तर युती झाली नाही असे नसते, असे उदय सामंत म्हणाले.
-
भविष्यात त्यांची जी भूमिका ठरेल, तेव्हाच आम्ही त्यावर बोलू, असेही उदय सामंत म्हणाले.
-
प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे.- उदय सामंत
-
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, ते आज उद्धव ठाकरेंच्या पक्षात नेते म्हणून काम करत आहेत.- उदय सामंत
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
-
यावरदेखील उदय सामंत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
-
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करतील.- उदय सामंत
-
आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारी लोक आहोत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनीच आदराने बोलले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे उदय सामंत म्हणाले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख