-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं होतं.
-
यानंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काही मराठा संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेध व्यक्त करत हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
-
तसेच, भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. पुण्यातील सारसबाग परिसरातल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं.
-
या आंदोलनादरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या वेषभूषामध्ये एक तरुण सहभागी झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धोतर फेडून निषेध व्यक्त केला.
-
‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी, काळी टोपी काळे मन हेच भाजपचे अंतरमन, भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो,’ अशा घोषणा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
-
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते.
-
परंतु, विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत.
-
छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून ते त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा राबवित आहेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका